कुरिअरद्वारे तलवार मागवणार्या मुसलमान वडील आणि मुलगा यांना अटक !
अमळनेर येथील घटना !
अमळनेर – येथे कुरिअरद्वारे तलवार मागवणारे मुसलमान वडील आणि मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. अदनान सादिक खाटीक (वय १९ वर्षे) हा पांढर्या गोणीतून झाकून तलवार आणत होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने त्याचे वडील सादिक सुपडू खाटीक (वय ४७ वर्षे) यांच्या नावाने तलवार मागवली असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून अदनान याची दुचाकी आणि भ्रमणभाष असा १२ सहस्र ९५० रुपयांचा माल जप्त केला आहे. (ही तलवार नेमकी कुठून आणि कशासाठी मागवली होती ?, तसेच आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे तलवारी मागवल्या आहेत का ? याचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी ? – संपादक)