पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !
पुरी (ओडिशा) – येथील भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला २० जून या दिवशी प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी मंगला आरती करून भगवान जगन्नाथाला खिचडी अर्पण करण्यात आली. त्यानंतर रथांचे पूजन करण्यात आले. बलभद्र, बहीण सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ हे रथात विराजमान असतात. ही रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
#WATCH | A large number of devotees gather as the world-famous Lord Jagannath Rath Yatra 2023 is set to begin today. Visuals from Ahmedabad in Gujarat & Puri in Odisha#RathYatra #LordJagannath #LordJagannathRathYatra #Puri #Odisha #Ahmedabad #Gujarat pic.twitter.com/3QlJTiARqT
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) June 20, 2023
गुजरातची राजधानी कर्णावती येथेही प्रतिवर्षाप्रमाणे काढण्यात येणार्या भगवान जगन्नाथाची रथयात्रे २० जूनला प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते विधी करण्यात आला.