नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करणे हा समस्त हिंदूंवरील आघात ! – चिरण वीर प्रताप खड्का, प्रमुख, ॐ रक्षा वाहिनी, नेपाळ
रामनाथी, २० जून (वार्ता.) – भारत आणि नेपाळ यांच्या जनतेमध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक संबंध आहेत. भारतातील काही प्रसारमाध्यमे, बुद्धीजिवी, राजकीय पक्ष वेळोवेळी नेपाळविषयी विवादित वक्तव्य करून भारत आणि नेपाळ यांमध्ये विवाद निर्माण करत आहेत. यामुळे नेपाळमधील जनतेमध्ये भारताविषयी नकारात्मकता निर्माण केली जात आहे. वैदिक सनातन धर्म हाच नेपाळचा धर्म आहे. भारत आणि नेपाळ यांमध्ये वर्षानुवर्षे बंधुत्वाची भावना आहे. नेपाळ ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे; मात्र मागील १ दशकापासून नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करून समस्त हिंदूंच्या श्रद्धेवर प्रहार करण्यात आला आहे. नेपाळ लवकरच हिंदु राष्ट्र होईल. नेपाळसह संपूर्ण विश्वाला हिंदु राष्ट्र करण्याचे ध्येय हिंदूंनी बाळगायला हवे. यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट व्हावे, असे आवाहन नेपाळ येथील ‘ॐ रक्षा वाहिनी’चे प्रमुख चिरण वीर प्रताप खड्का यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.