टायटॅनिक नौकेचे अवशेष पहाण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता !
नवी देहली – साऊथॅम्प्टन (इंग्लंड) ते न्यूयॉर्क (अमेरिका) या सागरी मार्गावर १५ एप्रिल १९१२ या दिवशी निघालेली ‘टायटॅनिक’ ही महाकाय प्रवासी जहाज कॅनडाच्या न्यूफाउंडलँड शहराजवळ अटलांटिक महासागरातील एका हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. वर्ष १९८५ मध्ये त्याचे अवशेष खोल समुद्रात असल्याचा शोध लागला होता. हे अवशेष पहाण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली.
Desperate search for missing submarine viewing Titanic with five onboard | 9 News Australia #MissingPerson #BreakingNews #MissingPersonAlert https://t.co/Qnv6xwy1Dy pic.twitter.com/f9PoQrGAqW
— Brett Murphy (@bmurphypointman) June 20, 2023
पाणबुडीचा माग काढण्यासाठी शोध आणि बचाव कार्य चालू करण्यात आले आहे. या पाणबुडीत किती लोक होते ? हे स्पष्ट झालेले नाही. छोट्या पाणबुड्या अधूनमधून पर्यटक आणि तज्ञ यांना टायटॅनिक बुडाले, ते ठिकाण पहाण्यासाठी घेऊन जातात. त्यासाठी पैसे घेतले जातात. तेथपर्यंतच्या प्रवासासाठी सहस्रो डॉलर खर्च येतो. टायटॅनिकच्या अवशेषांजवळ पोचायला आणि परतायला ८ घंटे लागतात. टायटॅनिकचे अवशेष अटलांटिक महासागराच्या ३ सहस्र ८०० मीटर (१२ सहस्र ५०० फूट) खाली आहे.