हिंसाचार थांबवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा !
मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची चेतावणी !
इंफाळ (मणीपूर) – हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा, अशी चेतावणी मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली. हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
Stop violence or face consequences: #Manipur CM #NBirenSingh warns people
Manipur chief minister N Biren Singh issued a stern warning to the people, stating that if they fail to put an end to the violence in the state, they will have to face the inevitable repercussions.…
— The Times Of India (@timesofindia) June 19, 2023
१. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.
२. पीडितांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, मी काही साहाय्य छावण्यांना भेट दिली; पण अजूनही अनेक लोक त्रस्त असल्याचे माझ्या निदर्शनास आले. सरकार त्यांच्यासाठी अनुमाने ४ सहस्र घरे बांधेल.