दक्षिण पूर्व आशियात भूकंपाचे धक्के !
जकार्ता (इंडोनेशिया) – दक्षिण पूर्व आशियातील पापुआ न्यू गिनी या देशामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याचे वृत्त आहे. २० जून या दिवशी आलेला हा भूकंप ५.५. रिक्टर तीव्रतेचा असल्याची माहिती ‘युरोपियन मेडिटरेनियन सेस्मॉलॉजिकल सेंटर’ने दिली. ‘सी.जी.टी.एन्.’ या चिनी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ असलेल्या समुद्रात २४ किमी खोल होते.