गोवा : कोकणी माध्यमातील इयत्ता १ लीच्या पाठ्यपुस्तकात हिंदूंसाठी धक्कादायक प्रकार !
‘गणेशचतुर्थी’वर ४ ओळी, तर ख्रिस्त्यांचे ‘रविवारचे मास’ (प्रार्थनासभा) आणि नाताळ यांवर पूर्ण २ पाने भरून माहिती
पणजी, १९ जून (वार्ता.) – कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ वरून ‘औरंगजेब’ असा उल्लेख असल्याने वाद निर्माण झाल्याची घटना ताजी असतांनाच आता कोकणी माध्यमातील पहिल्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकामध्ये हिंदूंच्या ‘गणेशचतुर्थी’वर ४ ओळी, तर ख्रिस्त्यांचे रविवारचे मास (प्रार्थनासभा) आणि नाताळ यांवर २ पूर्ण पाने भरून माहिती देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोकणी माध्यमातील पहिल्या इयत्तेसाठी ‘गाेमंत भारती’ या नावाचे पुस्तक आहे आणि यामध्ये धडा क्रमांक ९ हा ‘चवथ’ (चतुर्थी) या शीर्षकाखाली आहे. यामध्ये ‘रतन आज चतुर्थी आहे, मखर बनव आणि आरती कर’, अशा आशयाची माहिती एकूण ११ शब्द असलेल्या ४ ओळींत दिलेली आहे, तर याच पुस्तकात धडा क्रमांक १७ हा ‘मिसाक वतात’ (रविवारच्या प्रार्थनासभेला जातो) आहे. यामध्ये ‘आज रविवार, सकाळी ‘घण, घण’ घंटा ऐकू येते. रिता आणि इनास उठून स्वच्छ होऊन प्रार्थनासभेला जाण्यासाठी सिद्ध होतात. रिता आणि इनास अन् त्याचे आई-वडील प्रार्थनेला जातात. त्यांना सोबत अनेक मित्र भेटतात आणि सर्वजण प्रार्थनेला जातात. चर्चमध्ये फादर प्रार्थना करतो. सर्वजण मन लावून प्रार्थना ऐकतात आणि शेवटी समाधानी होऊन घरी परतात.’’ ही माहिती एकूण ७० शब्दांच्या १९ ओळींमध्ये देण्यात आली आहे.
अशाच प्रकारे ‘नाताल’ (नाताळ) या शीर्षकाखाली धडा क्रमांक ३० आहे. यामध्ये नाताळाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व माहिती एकूण सुमारे ६० शब्दांच्या १६ ओळींत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकावर लेखक समितीतील सदस्यांची नावे देण्यात आली आहेत आणि यामधील ६ पैकी ५ सदस्य हिंदु आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे धर्माविषयी अभिमानही नाही. पुरो(अधो)गामी विचारसरणीमुळे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि हिंदूंचे दमन करणे म्हणजेच सर्वधर्मसमभाव अशी शिकवण मिळाल्याने असे प्रकार घडतात ! – संपादक)
हे ही वाचा –
♦ गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख
https://sanatanprabhat.org/marathi/693604.html
संपादकीय भूमिकाशिक्षण खाते पाठ्यपुस्तके पडताळत नाही का ? असे प्रकार काँग्रेसच्या काळात होत असत. भाजपच्या राज्यात असे अपेक्षित नाही ! |