‘एम्.पी.टी.’वर नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ! – डॉ. एम्. बीना

‘जी-२०’ च्या बैठकीतील माहिती

‘कोचिन पोर्ट’च्या अध्यक्षा डॉ. एम्. बीना (मध्यभागी) आणि इतर मान्यवर

पणजी, १९ जून (वार्ता.) – पश्चिम किनारपट्टीवरील सांस्कृतिक केंद्रांना जोडणारे क्रूझ जलमार्ग उभारून त्या आधारे देशी विदेशी पर्यटन वाढवण्यात येणार आहे. यासाठी गोव्यातील मुरगाव येथील ‘एम्.पी.टी.’ बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल नोंव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘कोचिन पोर्ट’च्या अध्यक्षा डॉ. एम्. बीना यांनी दिली.

गोव्यात चालू असलेल्या ‘जी-२०’ कार्यगटाच्या परिषदेमध्ये १९ जून या दिवशी क्रूझ टर्मिनल आणि पर्यटन या विषयावर बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

डॉ. एम्. बीना पुढे म्हणाल्या, ‘‘पश्चिम किनार्‍यावरील मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कन्नूर कोझिकोड या मार्गावरील क्रूझ सेवेला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रारंभ होत आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.’’