परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतांनाचा प्रसंग आठवून भावजागृती होणे
‘११ मे २०२३ या दिवशी झालेला सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळणार; म्हणून पुष्कळ आनंद होत होता. सोहळ्यासाठी येणार्या साधकांची परात्पर गुरु डॉक्टर आठवले किती काळजी घेत आहेत ! हे साधकांसाठी सिद्ध केलेल्या बैठकव्यवस्थेच्या माध्यमातून कळल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता.
प्रत्यक्ष सोहळा पहातांना ‘ज्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या रथात विराजमान होऊन येत होत्या’, ते दृश्य पाहून ‘महाभारताच्या वेळी भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला गीता सांगत होते’, तो प्रसंग आठवत होता आणि भावजागृती होत होती. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवान विष्णु अवतीर्ण होऊन सर्वांना दर्शन देत आहेत’, असे वाटत होते. ‘ब्रह्मोत्सव सोहळा संपूच नये’, असे वाटत होते. सोहळ्यात काळाचे भान नव्हते. त्यामुळे वेळ कधी निघून गेला, हे कळलेच नाही. संपूर्ण कार्यक्रमात भावजागृती होत होती. हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (सद़्गुरु) सत्यवान कदम, सिंधुदुर्ग (१४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |