पाण्याच्या समस्येच्या विरोधात विरारमध्ये जलआक्रोश मोर्चा !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पाण्याच्या समस्येसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणे दुर्दैवी !
पालघर – जिल्ह्यातील विरार परिसरातील नागरिकांच्या वतीने १८ जून या दिवशी सकाळी १० वाजता जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरार पूर्व आणि पश्चिम भागांत मागील अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यासंबंधीचे निवेदन पालिका अधिकार्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला. येथील पत्रकार मयुरेश वाघ, शिवसेना आमदार सुरेश चौधरी आणि ‘गोविंद बिल्डर्स’चे निषाद चोरघे या मोर्च्यात सहभागी झाले. पालिका अधिकार्यांनी याविषयीचे निवेदन स्वीकारून ‘लवकरच पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल’, असे आश्वासन दिले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी झाले होते.