केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात महिलेने उडवल्या नोटा !
केदारनाथ (उत्तराखंड) – केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एका महिलेने नोटा उडवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
सौजन्य etv भारत
या प्रकरणी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी अधिकार्यांना चौकशीचा आदेश दिला आहे. या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांना दोषींवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्हटले आहे. (धर्मशिक्षणाअभावी जन्महिंदूंकडून होणारे पाप रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण द्या ! – संपादक)