‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या चौथ्या दिवसातील पहिल्या सत्राचे सूक्ष्म परीक्षण
प्रा. मधु किश्वर, संपादक ‘मानुषी’, देहली
१. ‘त्यांच्यात एखाद्या विषयातील सत्य शोधण्याचा ध्यास असतो.
२. त्या तत्त्वनिष्ठ असल्याने त्यांच्या विषयाची मांडणी वस्तूनिष्ठ असते.’ – श्री. राम होनप
३. ‘प्रा. मधु किश्वर यांंच्यात धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, संशोधन आणि त्यासाठी त्याग करण्याची वृत्ती आहे.’ – कु. मधुरा भोसले आणि श्री. निषाद देशमुख
४. ‘त्यांच्यातील धर्मरक्षणाच्या तळमळीमुळे त्यांची बुद्धी सात्त्विक आणि प्रगल्भ झाली आहे. त्यामुळे त्या सत्याचा शोध घेत धर्महानीविषयीचे सविस्तर विश्लेषण समाजासमोर मांडत आहेत.’ – श्री. निषाद देशमुख
५. ‘अभ्यासू वृत्तीमुळे त्यांच्यात हिंदुत्वाच्या समस्येच्या मुळाशी जाऊन धर्महानीची मूळ कारणे शोधणे आणि त्यावर धर्मचिंतन करून उपाययोजना काढणे’, हे गुण निर्माण झाले आहेत.’ – कु. मधुरा भोसले
श्री. कुरु ताई, उपाध्यक्ष, अरुणाचल प्रदेश बांस संसाधन आणि विकास एजेंसी, अरुणाचल प्रदेश.
१. ‘त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी आहे.’ – श्री. राम होनप
२. ‘श्री. कुरु ताई यांच्यात ‘धर्माप्रती निस्सीम भाव, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, सत्यनिष्ठता, तत्त्वनिष्ठता आणि कर्मनिष्ठता’, असे गुण आहेत.
३. त्यांच्या ‘सातत्याने धर्मसेवा करण्याची तळमळ आणि श्रद्धा’ या गुणांत वाढ झाली आहे. या गुणांमुळे त्यांना हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदुहिताचे रक्षण करण्याच्या धर्मकार्यात यश मिळत आहे.’ – कु. मधुरा भोसले आणि श्री. निषाद देशमुख
४. ‘साधनेमुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना विविध धर्मकार्यामध्ये यश मिळत आहे.’ – श्री. निषाद देशमुख
५. ‘त्यांच्यात प्रखर राष्ट्रप्रेम आणि लढाऊ वृत्ती असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही हिंदुत्वासाठी संघर्ष करून ते धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत.’ – कु. मधुरा भोसले