भोपाळ येथे ६ मुसलमानांनी हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावले !
धर्मांतरासाठी दबावही आणला !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यामध्ये काही मुसलमान विजय रामचंदानी नावाच्या एका हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला ओढत नेत असल्याचे आणि कुत्र्यासारखे भुंकायला लावत असल्याचे दिसत आहे. पीडित तरुण रस्त्यावर गुडघे टेकून बसला आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्या एका व्यक्तीने पट्टा पकडला आहे. या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी स्वत:हून नोंद घेत आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. ‘कठोर कारवाई कशी करावी ?’, याचे उदाहरण ठेवण्यासही पोलिसांना सांगण्यात आले आहे.
गले में बांधा बेल्ट और युवक को बनाया कुत्ता, बेरहम आरोपी बोले- भौंक…सॉरी बोल
(By @ReporterRavish) | #MadhyaPradesh https://t.co/E3L34oz95t
— AajTak (@aajtak) June 19, 2023
१. संबंधित व्हिडीओमध्ये पीडित हिंदु ‘मी मियाँ भाई (मुसलमान) बनण्यास सिद्ध आहे’, असे म्हणतांना दिसत आहे.
२. पीडित हिंदूच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध धार्मिक स्वातंत्र्य कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.
३. हा व्हिडिओ भोपाळमधील टिला जमालपुरा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या भोपाळमध्ये बिलाल टिला, फैजान लाला, साहिल बच्चा, महंमद समीर टिला आणि मुफिद खान यांनी विजयला मारहाण केली. हा व्हिडिओही त्यांनीच बनवला आहे.
तिन्ही आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवणार !या प्रकरणातील मुख्य आरोपीने अतिक्रमण करून घर बांधल्याचे उघड झाल्यावर ते अतिक्रमण पाडण्यात आले. अटक केलेल्या ३ आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. यासह आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांर्तगत कारवाई करण्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. |
भोपाल में हिंदू लड़के को कुत्ता बना कर गले में बेल्ट डालकर पिटाई करने वाले फैजान और समीर के घर को ढहाया गया।#Bhopal #भोपाल pic.twitter.com/SBH4kUEggJ
— Ambuj Mishra (@Ambujmishra9090) June 19, 2023
संपादकीय भूमिका
|