हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश
विद्याधिराज सभागृह – जातीव्यवस्था ही देशापुढे समस्या आहे. जाती आपण निर्माण केलेल्या नाहीत. आपल्या व्यवसायातून जाती निर्माण झाल्या आहेत. काही राजकीय पक्षही जातीच्या आधारे बनले आहेत. अनेक राजकीय पक्षांमध्ये पदेही जातीच्या आधारे दिली जातात. निवडून येण्यासाठी राजकीय पक्षांना जातीचा आधार घ्यावा लागतो. हिंदू जातीमध्ये विभागले आहेत आणि यामध्ये देवता अन् महापुरुष यांनाही जातीनुसार विभागले आहे. असे करतांना अन्य जातीच्या महापुरुषांवर टिका करण्याचा कुणालाही अधिकार नाही. संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला. हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल, असे वक्तव्य उत्तरप्रदेशातील अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेचे संरक्षक जुगल किशोर तिवारी यांनी केले.