अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त !
‘ईडी’ची कारवाई !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे. ‘ईडी’ने वर्ष २०१५ मध्ये गुजरातच्या वडोदरा येथे नोंदवलेल्या गुन्ह्यात इ.सी.आय.आर्. (ECIR) नोंद केला होता. त्यानंतर या प्रकरणी आरोपपत्रही प्रविष्ट केले होते.
अंमलबजावणी संचलनालयाने अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल जयसिंघानी याची 3.4 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. #Aniljaisinghani https://t.co/p55fx5hF6G
— Saamana (@SaamanaOnline) June 17, 2023
जयसिंघानी वर्ष २०१५ पासून ‘ईडी’चे समन्स टाळत आहे, तसेच तो अन्वेषणातही सहकार्य करत नव्हता. त्यामुळे वर्ष २०१५ मध्ये विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट लागू केले होते. त्यानंतर ८ एप्रिल २०२३ या दिवशी ‘ईडी’ने जयसिंघानी याला अटक केली होती. त्यानंतर त्याने अहमदाबाद येथील पी.एम्.एल्.ए. न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली होती; पण तिथे त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.