इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्पावन परिवाराच्या वतीने मार्गदर्शन !
सांगली – ‘रोटरी क्लब विभाग सांगली’ येथे चित्पावन परिवार सांगली यांच्या वतीने नुकतेच १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणासंबंधी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना विलींग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर आणि लेखापरीक्षक धीरज देशपांडे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. प्राचार्य ताम्हणकर यांनी शिक्षण आणि चाकरी यांच्या कोणत्या संधी कोणत्या प्रकारच्या पुढील शिक्षणातून उपलब्ध होतील ? ते सांगितले. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, आरोग्य, कला, क्रीडा, व्यवस्थापन यांसह अनेक उपलब्ध शाखांचा अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.