हिंदूंचे हे राष्‍ट्रीय नव्‍हे, तर ‘वैश्‍विक हिंदु अधिवेशन’ ।

श्री. अविनाश जाधव

हिंदूंचे हे राष्‍ट्रीय नव्‍हे,
तर ‘वैश्‍विक हिंदु अधिवेशन’ ।
होत आहे विश्‍वाची ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या दिशेने वाटचाल ॥ १ ॥

हिंदुत्‍वाच्‍या विचारांना येते,
आपोआप धार ।
हिंदुत्‍व जिवंत ठेवण्‍यासाठी आहे, हा एक आधार ॥ २ ॥

पुरोगामी आणि निधर्मी यांची विचारांची तलवार होते म्‍यान (टीप)
भ्रष्‍ट अन् सत्तापिपासू राजकारण्‍यांना धडकी भरते उरात ॥ ३ ॥

धर्मद्रोही अन् हिंदुद्वेषी यांच्‍या विरोधाला मिळते एक धार ।
हिंदूंमध्‍ये फूट पाडणार्‍यांवर चालवू हिंदु ऐक्‍याचा वार ॥ ४ ॥

चला हिंदूंनो, श्रीकृष्‍णाला साक्षी मानून शपथ घेऊया ।
भारतालाच नव्‍हे, तर सारे ‘विश्‍व’ हिंदु राष्‍ट्र करूया ॥ ५ ॥

श्रीमन्‍नारायणाच्‍या कार्याला गोप-गोपींप्रमाणे काठ्या लावूया ।
अंतर आणि बाह्य मनात धर्माचरणरूपी हिंदु राष्‍ट्र आणूया ॥ ६ ॥

हिंदु राष्‍ट्राचे ध्‍येय अंतर्मनात तेवत ठेवून कार्यप्रवण होऊया ।
भगवान श्रीकृष्‍णाला शरण जाऊनी धर्माचा लढा त्‍वेषाने लढूया ॥ ७ ॥

या घोर कलियुगात अवनीवर पुन्‍हा हिंदु राष्‍ट्र येईल ।
श्रीमन्‍नारायणाच्‍या संकल्‍पाने
ही हिंदु भूमी सुजलाम् सुफलाम् होईल ॥ ८ ॥

टीप – तलवार होते म्‍यान : सर्व पर्याय करून थकणे

– श्रीविष्‍णुर्पणमस्‍तु

श्री. अविनाश जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के), सनातन आश्रम, गोवा. (१३.६.२०२३)