सातारा येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कर्मचार्याला मारहाण !
सातारा, १८ जून (वार्ता.) – येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयासमोर (वाय.सी. कॉलेजसमोर) वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचार्यास अज्ञातांनी लाकडी दांडके आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली. यामध्ये पोलीस कर्मचारी योगेश जाधव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
याविषयी वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी योगेश कृष्णात जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अजंठा चौक येथून जातांना ४ अज्ञातांनी माझ्या दुचाकीचा पाठलाग केला. वाय.सी. महाविद्यालयासमोर गाडी थांबवून ‘गल्लीत तू पुष्कळ दादागिरी करतोस, गल्लीतील लोकांना त्रास देतोस’, असे म्हणत मारहाण केली.
संपादकीय भूमिका :गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसणे, हे गंभीर आहे ! पोलिसांनी हे चित्र पालटण्यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक ! |