प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून साधना करावी ! – पू. प्रदीप खेमका, धर्मप्रचारक, सनातन संस्था (झारखंड)
कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, त्याचवेळी माझे व्यवसाय व्यवस्थित चालत होते. ‘माझा व्यापार गुरुदेवांचा आहे’, असा माझा भाव आहे. साधना मी स्वत:साठी करत आहे. कोरोनाच्या काळात माझा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. माझ्या कोणत्याही कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्ये खरोखर शक्ती असल्याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे. साधना स्वत:सह कुटुंब, उद्योग आणि आपले कार्यक्षेत्र या सर्वांना सुरक्षित ठेवते. माझ्या २ कर्मचार्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग करणे, स्वत:मधील दोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणे, सतत ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे हे साधनेचे प्रयत्न आचरणात आणावेत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्य करावे; परंतु त्यासह साधना करावी, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक झारखंड येथील पू. प्रदीप खेमका यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.