भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार्यांनाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू ! – अजित सिंह बग्गा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडल आणि अध्यक्ष, वाराणसी व्यापार मंडल
औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही. आपल्या भावी पिढीला आपण राष्ट्राभिमान आणि हिंदु धर्म यांची शिकवण द्यायला हवी. भारतात रहायचे असेल, तर ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल. भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने स्वत:च्या क्षेत्रात जनजागृती करायला हवी. त्यासाठी वेळ द्यायला हवा. असे केल्यामुळेच सर्व हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राची भावना निर्माण होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपल्या रक्तामध्ये हिंदुत्व असायला हवे. जो राजकीय पक्ष भारताला हिंदु राष्ट्र घोषित करेल, त्या पक्षालाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू, हे हिंदूंनी ठरवून घ्यावे, असे उद्गार व्यापार मंडलाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आणि वाराणसी व्यापार मंडलाचे अध्यक्ष अजितसिंह बग्गा यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) बोलत होते.