बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या ताफ्यावर आक्रमण
कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तेथे हिंसाचार चालू झाला आहे. १७ जून या दिवशी केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या वाहनाच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले. या घटनेच्या वेळी पोलीस मूकदर्शक होते, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रमाणिक यांनी केला. भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी ‘ममता बॅनर्जी सरकारमधील पोलीस लाचार आहेत’, अशी टीका करत प्रमाणिक यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आल्याचा दावा केला.
‘Bombs hurled at us’: Union minister Nisith Pramanik alleges attack on his convoy in West Bengal’s Cooch https://t.co/3bq2U30i8O
— The Times Of India (@timesofindia) June 17, 2023
यापूर्वी २५ फेब्रुवारी या दिवशीही अशा प्रकारचे आक्रमण करण्यात आले होते. यात भाजपचे काही कार्यकर्ते घायाळ झाले होते.