संभल (उत्तरप्रदेश) येथे मशिदीत नमाजपठणासाठी गेल्यामुळे भाजपच्या मुसलमान नेत्याला मारहाण !
संभल (उत्तरप्रदेश) – मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गेल्यामुळे भाजपच्या मुसलमान नेत्याला येथील मुसलमानांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. शाह आलम असे या नेत्याचे नाव आहे.
१. आलम यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते येथील जिल्ह्याचे भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चाचे सहअध्यक्ष आहेत. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना आलम म्हणाले, ‘‘माझ्यासह माझा भाऊ आणि पुतणे यांनाही मारहाण करण्यात आली. आम्ही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर पाठलाग करून मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यामागे ‘मी भाजपमध्ये प्रवेश केला’, हे कारण होते.’’
२. दुसरीकडे पोलिसांनी या मारहाणीमागे राजकीय कारण असल्याचा दावा फेटाळत दुकानाच्या भाड्यावरून ही मारहाण झाल्याचा दावा केला. आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांची अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे होते ? |