मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रिक्शाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि रिक्शाचालक विनय पांडे याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) त्याचा परवाना रहित केल्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी धाव घेतली आणि त्याला आत्मदहनापासून रोखले. पांडे याच्यावर याआधी अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे.