मुसलमान तरुणाकडून गोव्यातील हिंदु तरुणीची विवाहानंतर पुण्यात नेऊन इस्लाम स्वीकारण्यावरून छळवणूक !
फोंडा येथील अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी मुलीची केली सुटका
पणजी, १७ जून (वार्ता.) – गोव्यातील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. पुण्यातील मुसलमान तरुणाने लग्नानंतर धर्म पालटण्यास (इस्लाम स्वीकारण्यास) आग्रह करून हिंदु मुलीची छळवणूक केली. या प्रकरणी फोंडा येथील अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मुलीची अखेर धर्मांध मुसलमान पतीच्या तावडीतून सुखरूपपणे सुटका झाली.
‘निकाह’नंतर अवघ्या २ मासांत इस्लाम स्वीकारण्याची मुलीला घातली अट
‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या गोव्यातील हिंदु तरुणीने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. ती मुळातच हुशार आणि देखणी असल्याने तिची पुण्यातील एका आस्थापनात निवड झाली. पुण्यामध्ये तिची एका मुसलमान युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ‘ही गोष्ट आई-वडिलांना कशी सांगायची ? हा प्रश्न तरुणीला पडला. अखेर तिने तिचा निर्णय घरच्यांना सांगून कायमस्वरूपी गोवा सोडला. प्रारंभी प्रेमाने वागणार्या संबंधित युवकाने तिला त्याच्या घरी नेले आणि नंतर त्यांचा ‘निकाह’ झाला. त्यानंतर अवघ्या २ मासांनी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याची अट घालण्यात आली. नकार दर्शवल्यानंतर तिच्या छळवणुकीला प्रारंभ झाला.
मशिदीत नेऊन वशीकरण आणि काळे कपडे परिधान करण्याची सक्ती
तिला अगोदर एका मशिदीत जाऊन तिचे वशीकरण करण्यात आले आणि त्यानंतर तिने भीतीपोटी होकार दिला. मध्यंतरी नवर्याने तिच्या भ्रमणभाषवर हिंदु देवतांच्या प्रार्थना आणि इतर माहिती पाहिली. यानंतर ‘हे सर्व बंद कर, अन्यथा गाठ माझ्याशी आहे’, अशी तंबी तिला देण्यात आली. तिला सक्तीने काळे कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले.
इस्लाम स्वीकारण्यास सिद्धता दर्शवली नसल्याने मुलीने वर्षभर सोसली मारझोड आणि छळवणूक
मुलीने इस्लाम स्वीकारण्यास सिद्धता दर्शवली नसल्याने तिने वर्षभर मारझोड आणि छळवणूक सहन केली. अखेर तिने वडिलांना सर्व गोष्ट सांगितली. वडिलांनी याविषयी फोंडा येथील समाजसेवक तथा अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे व्यथा मांडली.
अशी केली ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून मुलीची सुखरूप सुटका
अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी यासाठी पुणे येथील अधिवक्ता सचिन लोखंडे यांचे साहाय्य घेतले. पुणे येथे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून ओळखल्या जाणार्या महंमदवाडी येथे जाऊन ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या तरुणीला परत आणणे हे एक फार मोठे आव्हान होते. तिची ‘लव्ह जिहाद’ प्रकरणामधून सुटका करण्यासाठी अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी व्यूहरचना आखली. या प्रकरणी दोन्ही अधिवक्त्यांनी पुणे पोलिसांना संपर्क केला आणि तत्पूर्वी ‘बजरंग दल’ आणि ‘विश्व हिंदु परिषद’ यांच्या कार्यकर्त्यांनाही याविषयी पूर्वकल्पना दिली. ज्या महंमदवाडीत मुलगी होती तेथे त्यांनी प्रवेश मिळवला. पती आणि तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या दोघांशी पोलीस स्वतंत्रपणे बोलले. सर्वांसमक्ष दोघांची निवेदने नोंद करून घेण्यात आली. पोलिसांसमोर मुसलमान तरुणाने सर्व आरोप मान्य केले आणि ‘यानंतर आपण असा कधीही वागणार नाही. आपल्याकडून चूक झाली’, असे सांगून मुलीचे वडील आणि भाऊ यांची त्याने क्षमा मागितली; मात्र मुलीने ‘मला आता क्षणभरही थांबायचे नाही आणि मी स्वखुशीने घरी जात आहे’, असे लेखी निवेदन पुणे पोलिसांना दिले. त्यानंतर सर्वजण गोव्यात येण्यास निघाले. याविषयी गोवा महिला आयोग आणि महाराष्ट्र महिला आयोग यांना माहिती देण्यात आली आहे. अधिवक्ता कुलकर्णी यांनी यापूर्वी अशा पद्धतीची अनेक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. महिलांच्या छळाच्या विरोधात त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये गोवा महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून दिला आहे. (धर्मांध मुसलमानांना न घाबरता हिंदु मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यातून सोडवून आणणारे अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांचे अभिनंदन ! – संपादक)