हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे झालेले काही प्रातिनिधिक लाभ !
१. अनेक न्यायालयीन प्रक्रियांमध्ये धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अधिवक्ते लाभले !
२. धर्मकार्य करणार्या धर्माभिमान्यांना साहाय्य करणारे उद्योगपती भेटले !
३. हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देण्यास प्रारंभ झाला !
४. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तर अनेकांना संतपद घोषित करण्यात आले !
५. भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तान येथेही हिंदु राष्ट्राच्या स्थानपेचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येऊ लागला !
६. विदेशातील हिंदूंच्या व्यथा समोर आल्याने त्याविरोधात लढा देणे सोपे गेले !
७. हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच होऊ शकते, हे अनेकांच्या मनावर बिंबले !
८. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी निर्धार केला !
९. अनेक हिंदुत्वनिष्ठ राष्ट्र आणि धर्म या दृष्टीने खांद्याला खांदा लावून कार्य करण्यासाठी एकवटले !