रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. विजय डोंगर पवार (अध्यक्ष, आशापुरी मंदिर देवस्थान), स्टेशन रोड, शिंदखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, महाराष्ट्र.
अ. ‘साधक स्वतःकडून झालेली चूक फलकावर लिहितात’, हे मला अप्रतिम वाटले.
आ. आश्रमाच्या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्कळ आनंद देऊन गेली.’
२. श्री. मनोज सुभाष जोहरी, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून माझ्या मनाला शांती मिळाली.
आ. आश्रमात नियोजनबद्ध आणि निःस्वार्थ भावनेने महान कार्य चालू आहे.
३. श्री. रोहित मनमोहन सूर्यवंशी (‘मेंबर ऑफ द ग्रोइंग बड्स फाउंडेशन’), तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून एकदंरीत वाटले, ‘देव, देश आणि धर्म यांचे कार्य एकाच ठिकाणी चालू असलेला हा आश्रम किंवा धर्मवास्तू आहे.’
४. श्री. अशोक खंडेलवाल (विश्वस्त, श्री लक्ष्मीनारायण संस्थान), अचलपूर, तालुका परतवाडा, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील कार्य पाहून मला भरून आले.
आ. ‘येथील सर्व कार्य पाहून माझी ऊर्जा वाढली,’ असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.६.२०२३)