हिंदूंच्‍या हृदयातील तेज जागृत झाल्‍यास रज-तमात्‍मक अंधकाराचे रूपांतर हिंदु राष्‍ट्रात होईल ! 

१. ‘हिंदू तेजा जाग रे ।’, हे वाक्‍य म्‍हणतांना हिंदु धर्मातील तेजालाच प्रार्थना करत असल्‍याचे वाटणे

कु. कौमुदी जेवळीकर

‘४.११.२०२२ या दिवशी मला थोडे बरे वाटत नव्‍हते; म्‍हणून मी खोलीत विश्रांती घेत होते. तेव्‍हा मी स्‍वतःच ‘हिंदू तेजा जाग रे ।’, हे वाक्‍य म्‍हणत होते. त्‍या वेळी ‘मी हिंदु समाजाला नाही, तर हिंदु धर्मातील तेजालाच प्रार्थना करत आहे’, असे मला वाटत होते.

२. भारतातील काही लोकांच्‍या हृदयात छोटे दिवे निर्माण झाले असून आकाशातून प्रकाशकिरण त्‍या अंधाराला भेदून त्‍या ज्‍योतींकडे येत असल्‍याचे दृश्‍य दिसणे

त्‍यानंतर मला पुढील दृश्‍य दिसले – ‘पूर्ण अंधार असून भारतातील काही लोकांच्‍या हृदयात छोटे छोटे दिवे निर्माण झाले आहेत आणि आकाशातून प्रकाशकिरण त्‍या अंधाराला भेदत त्‍या ज्‍योतींकडे येत आहे.’ ते पाहून मला वाटले, ‘या अंधकारात हिंदूंच्‍या हृदयातील तेज जागृत झाले, तर या रज-तमात्‍मक अंधकाराचे रूपांतर लगेच हिंदु राष्‍ट्रात होईल.’

देवा, हीच विनवणी पुन्‍हा तुम्‍हाला ।
हिंदु धर्माची ग्‍लानी दूर सारा ।
या तमोगुणी अंधार्‍या रात्रीचे ।
हिंदु राष्‍ट्रात रूपांतर करा ॥

कृतज्ञता प.पू. गुरुमाऊली !’

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक