हडपसर (पुणे) परिसरात पालखीच्या मार्गावर गोळा झालेला कचरा त्वरित हटवला !
हडपसर (जिल्हा पुणे) – मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पालखी प्रस्थानानंतर त्वरितच कचरा गोळा केला. क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सोलापूर आणि सासवड महामार्गावर हा कचरा गोळा करण्यात आला. त्यामध्ये ६ टन ५३० किलो ओला, तर १४ टन ३३० किलो सुका कचरा असा एकूण २० टन ८६० किलो कचरा गोळा करण्यात आला.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय धनवट यांनी सांगितले की, पालखीसोहळा काळात ५५ अधिकार्यांसह ८५९ कर्मचार्यांनी आरोग्य सुविधा देण्याचे काम केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही. हिरकणी कक्ष, ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वाटपामुळे महिलांना मोठे साहाय्य झाले. साहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले संयोजन झाले.