पुणे येथे सव्वासहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !
पुणे – पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि सोलापूर येथील पोलीस पथकांनी वर्ष १९९२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई केली. या ४७ गुन्ह्यांमध्ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्ह्यांतील गांजा आणि चरस नष्ट करण्याची अनुमती मिळाली. त्यानंतर जप्त केलेला १ सहस्र किलो गांजा आणि ७ किलो ८९६ ग्रॅम चरस नष्ट करण्यात आला आहे. या अमली पदार्थांचे मूल्य ६ कोटी २५ लाख रुपये इतके आहे.
The Pune Railway police, including Daund, Kurudwadi, Solapur, railway police stations had seized almost 1500 kg of drugs in 42 cases since 1992 till date.@PuneCityPolice #Crime #narcos #PunePolice
.
.
read here:https://t.co/9Od9nfIC3l— Pune Mirror (@ThePuneMirror) June 15, 2023