भाजप वकील आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड्. संजय सावंत यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी निवड !
पुणे – भाजप महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी संपर्क अभियान प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे ६ जून या दिवशी पार पडला. या वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पदाधिकार्यांना दायित्व देण्यात आले. यामध्ये ॲड्. संजय सावंत (पाटील) यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. ॲड्. संजय सावंत (पाटील) हे मागील ३ वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, ‘स्वच्छ भारत अभियान’मध्ये महाराष्ट्र राज्यावर राज्य संघटन सरचिटणीस, शिरूर लोकसभा संयोजक समिती सभासद या सर्व पदांवर सध्या कार्यरत आहेत.
तसेच गेली १६ ते १७ वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक संघटनांसह महाराष्ट्राभर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करत आले आहे. वकीली व्यवसाय करत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.