‘कोरोमंडल एक्‍सप्रेस’चा अपघात कि आतंकवादी आक्रमण ?

या वर्षी ३१ मार्च २०२३ या दिवशी २४ वर्षांचा एक मुसलमान तरुण देहली येथे जनसंपर्क क्रांती एक्‍सप्रेसमध्‍ये चढला. या रेल्‍वेगाडीच्‍या मार्गावरील शेवटच्‍या स्‍थानकाजवळ असलेल्‍या षोरणूर (केरळ) या गावात त्‍या तरुणाने पेट्रोल खरेदी केले. त्‍यानंतर २ एप्रिल २०२३ या दिवशी तो ‘आलाप्‍पुषा-कन्‍नूर एक्‍झिक्‍युटिव्‍ह एक्‍सप्रेस’ या रेल्‍वेगाडीत चढला. ही रेल्‍वेगाडी पुलावरून जात असतांना त्‍याने सहप्रवाशांवर पेट्रोल फवारून त्‍यांना पेटवून दिले. त्‍यातील प्रवासी गंभीररित्‍या भाजले. या रेल्‍वेतील एक प्रवासी आणि त्‍याच्‍या पत्नीने अर्भकासह रेल्‍वेगाडीतून उडी मारल्‍याने ते रेल्‍वे रूळांवर मृतावस्‍थेत आढळून आले. हे जिहादी कृत्‍य करणारा देहली येथील शाहीनबागमध्‍ये रहाणारा शाहरूख सैफी हा मुसलमान युवक होता. त्‍याचा शोध घेऊन महाराष्‍ट्र विशेष अन्‍वेषण पथकाने त्‍याला रत्नागिरी येथे पकडले. या विशेष पथकाने दिलेल्‍या माहितीनुसार रेल्‍वेत हे आक्रमण केल्‍यानंतर शाहरूखने आपला वेश पालटला होता. हा प्रकार ‘क्‍लोज सर्किट टिव्‍ही’मध्‍ये पाहिल्‍यावर लक्षात आला. शाहरूख याला स्‍थानिक लोकांकडून समर्थन आणि सुविधा देण्‍यात आल्‍या होत्‍या, याची विशेष पथकाला खात्री आहे.

यानंतर २ मासांनी १ जून २०२३ या दिवशी कन्‍नूर येथे पुन्‍हा एका रेल्‍वेच्‍या डब्‍याला आग लागली. सुदैव म्‍हणजे तो डबा रिकामा होता. हा डबा ‘भारत पेट्रोलियम’च्‍या इंधन साठवणीच्‍या जागेपासून काही मीटर अंतरावर होता. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार या वेळी गुन्‍हेगार हा प्रसेनजीत सिदगर नावाचा हिंदु होता आणि तो बंगालमधील २४ परगणा येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार आरोपीने मुंबई आणि कोलकाता येथील अनेक हॉटेल्‍समध्‍ये काम केले होते; मात्र गेल्‍या दोन वर्षांपासून तो भिकारी अवस्‍थेत फिरत होता. या काळात कोणतीही भिक्षा न मिळाल्‍याने निराशेपोटी त्‍याने रेल्‍वे डब्‍याला आग लावली. पोलिसांच्‍या म्‍हणण्‍यानुसार हे कृत्‍य त्‍याने उत्‍स्‍फूर्तपणे केले होते आणि आग लावण्‍यासाठी त्‍याने त्‍याच्‍याजवळ असलेल्‍या आगपेटीचा वापर केला. त्‍याला धुम्रपान करण्‍याची सवय असल्‍याने त्‍याच्‍याजवळ आगपेटी होती. जिहादी आतंकवादाला उत्तर देण्‍यासाठी एका हिंदूने हे कृत्‍य केले, असे कारण या मागे होते का ?

कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातानंतर डब्यांची झालेली दुरवस्था

१. जिहाद्यांची ‘इकोसिस्‍टम’ (विरोधकांची प्रणाली)

पोलिसांच्‍या म्‍हणण्‍यानुसार शाहरूख हा कट्टरपंथी आहे. त्‍याला हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक आणि पाकिस्‍तानात रहाणारे इस्‍लामी धर्मोपदेशक इसरार अहमद यांच्‍याकडून प्रेरणा मिळाली होती. प्रसेनजीत सिदगर याच्‍या कृत्‍यामागे कोणती प्रेरणा होती ? आक्रमणासाठी त्‍याने कन्‍नूर हा प्रदेश का निवडला ? कासारगोड येथे जिहादला सर्वांत अनुकूल ‘इकोसिस्‍टम’मुळे त्‍याने हे कृत्‍य केले असावे का ? कन्‍नूर, कोझिकोड, मल्‍लापुरम, पलकड्ड आणि वायनाड हे या जिहादी इकोसिस्‍टमचा भाग आहेत. कोईम्‍बतूर येथील जिहादी इकोसिस्‍टम ‘लव्‍ह जिहाद’च्‍या केंद्रस्‍थानी आहे. हीच जिहादी इकोसिस्‍टम भारतात इस्‍लामचे राज्‍य आणण्‍यासाठी जिहादी पुरवते आणि लव्‍ह जिहादमध्‍ये फसलेल्‍या महिलांचा ‘लैंगिक गुलाम’ म्‍हणून वापर करते. हाच भाग ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाच्‍या केंद्रस्‍थानी आहे.

कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

२. गोध्रा येथील भ्‍याड आक्रमणाची आठवण करून देणारा रेल्‍वेमधील आतंकवाद

जिहादी आक्रमण करण्‍यासाठी देहली आणि बंगाल येथून प्रवास करून केरळमधील कन्‍नूर का यावे लागते ? या घटनेवरून भारतातील जिहाद किंवा ‘गझवा-ए-हिंद’चे (इस्‍लामीस्‍तान) स्‍वरूप लक्षात येते. देहलीतील शाहीनबाग येथे भारताविरुद्धच्‍या जिहादी निदर्शनाला पाठिंबा देण्‍यासाठी केरळमधील ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) निधी पुरवते. शाहरूखने आपले जिहादी लक्ष्य (रेल्‍वेमधील प्रवासी) गाठण्‍यासाठी शाहीनबाग ते केरळ असा प्रवास केला. रेल्‍वेमधील आतंकवाद हा भारताच्‍या जिहादी आतंकवादाच्‍या शब्‍दकोशामधील एक भाग आहे. शाहरूखने निवडलेली कार्यपद्धत २७ फेब्रुवारी २००२ मध्‍ये गोध्रा येथील साबरमती एक्‍सप्रेसवर झालेल्‍या भ्‍याड आक्रमणाची आठवण करून देणारी होती. एक प्रकारे हे जिहादी आक्रमण होते.

३. आतंकवाद आणि जिहादी कारवाया यांमध्‍ये बंगाल राज्‍य आघाडीवर

केरळमधील कन्‍नूर येथे जिहादी आक्रमण करण्‍यासाठी देहली किंवा बंगाल येथून प्रवास का करावा लागतो ? कारण बंगाल हा आपल्‍या देशाच्‍या पूर्वेकडील बांगलादेश, आसामचा दक्षिण भाग, बिहारचा पूर्व भाग, बंगाल या ठिकाणी असलेल्‍या जिहादी इकोसिस्‍टमचा प्रमुख भाग बनला आहे. यामध्‍ये सिलीगुडी कॉरिडॉरचाही (सुसज्‍ज मार्गाचा) समावेश आहे. भारताच्‍या इतर भागांमध्‍ये पसरलेला आतंकवाद आणि जिहादी कारवाया यांमध्‍ये बंगालने बांगलादेशला मागे टाकले आहे. अलीकडे २२ मे या दिवशी कर्णावतीमध्‍ये गुजरात पोलिसांनी महंमद साजिद, खलिद अन्‍सारी, अझहरुल इस्‍लाम आणि मेनमुल अन्‍सारी या ४ आतंकवाद्यांना पकडले. हे सर्वजण बांगलादेशमधील प्रशिक्षित आतंकवादी होते. त्‍यांचे ‘अल् कायदा’ या जिहादी संघटनेशी संबंध होते आणि त्‍यांना गुजरातमध्‍ये जिहादी कारवाया करण्‍याचे उत्तरदायित्‍व देण्‍यात आले होते.

४. बेंगळुरूमध्‍ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ या जिहादी संघटनेच्‍या वाढत्‍या कारवाया

१५ जानेवारी २०२३ या दिवशी बेंगळुरू (कर्नाटक) येथील न्‍यायालयाने ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या जिहादी संघटनेच्‍या ४ सदस्‍यांना ७ वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात बाँब बनवण्‍याचे साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले हेते. यामध्‍ये रॉकेट लाँचर निर्मितीच्‍या साहित्‍याचाही समावेश होता. जिहादसाठी पैसा उभा करण्‍यासाठी या ४ आतंकवाद्यांनी बेंगळुरू शहरात दरोडेही घातले होते. यापूर्वी ३० नोव्‍हेंबर २०२२ या दिवशी ‘जे.एम्.बी.’च्‍या अन्‍य ३ आतंकवाद्यांना जिहादी कारवाया केल्‍याविषयी ७ वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली होती. हे सर्वजण बंगालमधील होते. जुलै २०१९ मध्‍ये राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) धाड घालून ‘जे.एम्.बी.’च्‍या सदस्‍यांकडून हँड ग्रेनेड आणि बाँब बनवण्‍याचे साहित्‍य जप्‍त केले होते. बेंगळुरू शहरातील विविध ठिकाणी आक्रमण करण्‍याचे त्‍यांचे नियोजन होते. हे बांगलादेशी जिहादी बेंगळुरूमध्‍ये आर्थिक जिहाद निर्माण करण्‍यातही गुंतलेले आहेत.

५. ‘गझवा-ए-हिंद’ बनवण्‍यासाठी दरोडे घालणे हे इस्‍लामी धर्मग्रंथातील ‘मेल गनिमत’चाच (युद्धातील लूट) एक भाग !

फेब्रुवारी २०२० मध्‍ये मुंबईत जिहादी आक्रमणे घडवून आणणार्‍या बंगाली भाषिक आतंकवाद्यांना खोट्या भारतीय चलनाचे वाटप केल्‍याविषयी एन्.आय.ए. न्‍यायालयाने एका बांगलादेशी नागरिकाला ६ वर्षांची शिक्षा सुनावली. बंगाली भाषिक जिहादी मुंबई, केरळ आणि बेंगळुरू येथे जिहादी आक्रमणे करत आहेत. यावरून उपखंडातील इस्‍लामच्‍या विस्‍ताराची कल्‍पना येते. ‘गझवा-ए-हिंद’साठी निधी उभारण्‍यासाठी दरोडे घालणे, हे इस्‍लामी धर्मग्रंथामध्‍येे उल्‍लेख केलेली ‘मेल गनिमत’ किंवा युद्धातील लूट ही संकल्‍पना आहे. इस्‍लाममधील अंतिम मसिहाशी संबंधित उदाहरणाने ते जिहादी प्रेरित आहेत.

६. बंगालमध्‍ये ‘जैश-ए-महंमद’ जिहादी संघटनेचे वाढते जाळे

उपखंडातील जिहादी तंझीम (संघटना) एकमेकांवर पोसलेले आहेत. या सर्व गटांची ‘अल् कायदा’ ही संघटना जननी आहे. ‘लष्‍कर ए तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या पाकिस्‍तानमधील जिहादी संघटनांचा बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांवर प्रभाव आहे. जानेवारी २०१६ मध्‍ये पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्‍या आक्रमणामध्‍ये ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी संघटनेसह ‘जे.एम्.बी.’संघटनेचा आतंकवादी झिया उल् हक याचाही महत्त्वाचा सहभाग आहे. त्‍याचे ‘जैश-ए-महंमद’शी जवळचे संबंध होते. बर्धमान (बंगाल) येथे झालेल्‍या स्‍फोट प्रकरणामध्‍ये तो प्रमुख दोषी आहे. वर्ष २०१४ मध्‍ये एन्.आय.ए.ने त्‍याला अटक केली होती. ‘जैश-ए-महंमद’ने बंगालशी चांगल्‍या प्रकारे संबंध प्रस्‍थापित केले आहेत. ‘जैश-ए-महंमद’ जिहादी संघटनेचा आतंकवादी बेलाल हुसेन उपाख्‍य नंदू मोंडल याला कंदहार येथील अपहरण प्रकरणी अटक करण्‍यात आली होती. बंगालमध्‍ये ‘जैश-ए-महंमद’चे जाळे पसरवण्‍यासाठी तो प्रसिद्ध होता.

७. ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे गाड्यांवर होत असलेली आक्रमणे जिहादच्‍या दृष्‍टीकोनातूनच

या वर्षाच्‍या प्रारंभीपासून मुसलमानबहुल प्रदेशांमध्‍ये ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे गाड्यांवर आक्रमणे झाली आहेत. या रेल्‍वेवर झालेल्‍या दगडफेकीच्‍या पद्धतीमध्‍ये विलक्षण साम्‍य आहे. ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेवर जिहादींनी आक्रमण केले; कारण ते भारतातील कोणत्‍याही प्रगतीशील विकासाकडे जिहादी किंवा पाकिस्‍तानी दृष्‍टीतून पहातात. भारताने पाकिस्‍तानच्‍या पातळीपर्यंत पोचावे, अशी त्‍यांची इच्‍छा आहे. त्‍यांच्‍यासाठी भारताची प्रगती अनाठायी आहे. भारताची सामरिक शक्‍ती वाढवण्‍यास योगदान देण्‍याच्‍या गैरइस्‍लामी कृत्‍याविषयी ते दिवंगत माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांना शाप देतात.

केवळ जानेवारी मासात बिहारमधील काधार, बंगालमधील फणसीदेवा आणि आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम् येथे ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेगाड्यांवर आक्रमण करण्‍याविषयीच्‍या ३ घटना घडल्‍या. त्‍यानंतर फेब्रुवारी मासात तेलंगाणामधील मेहबूबनगर आणि कृष्‍णराजपूरम अन् बेंगळुरू कँटोनमेंट यांच्‍यामधील मार्ग अशी २ आक्रमणे झाली. पुन्‍हा मार्च मासात बंगालमधील मुर्शिदाबाद येथे ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’ची मोडतोड करण्‍यात आली. एप्रिल मासात आंध्रप्रदेशमध्‍ये विशाखापट्टणम्‌शी जोडलेल्‍या ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’वर खमाम आणि विजयवाडा या रेल्‍वेस्‍थानकांमधील मार्गावर दगडफेक करण्‍यात आली. मे मासात कासारगोड आणि थिरूवनंतपूरम या रेल्‍वेस्‍थानकांमधील मार्गावरील ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेवर आक्रमण करण्‍यात आले.

‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’वर झालेली ही आक्रमणे केरळ ते बंगाल यांमध्‍ये ‘रेड कॉरिडॉर’ (नक्षलवादग्रस्‍त क्षेत्र) आणि ‘जिहादी कॉरिडॉर’ (धर्मांध जिहाद्यांचा प्रभाव असलेले क्षेत्र) असलेल्‍या भागात झाली आहेत. शाहीनबाग प्रकरणामध्‍ये माओवादी, जिहादी आणि त्‍यांचे राजकीय हस्‍तक यांच्‍यातील राष्‍ट्रविरोधी मैत्री पहायला मिळाली.

८. कोरोमंडल एक्‍सप्रेसचा अपघात  जिहाद्यांनी मोठ्या प्रमाणात लोकहानी करण्‍याच्‍या उद्देशाने घडवलेला घातपात

बालासोर (ओडिशा) हे याच ‘कॉरिडॉर’च्‍या जवळ आहे. बालासोर हे भारताचे क्षेपणास्‍त्र चाचणीचे ठिकाण असल्‍याने वैमनस्‍य असलेल्‍या परदेशातील गुप्‍तचर संस्‍था या प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्षपणे येथे कार्यरत होऊ पहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर २ जून २०२३ या दिवशी बालासोर येथे झालेल्‍या ‘कोरोमंडल एक्‍सप्रेस’च्‍या अपघातामध्‍ये २७५ लोकांनी जीव गमावला, याविषयी विचार झाला पाहिजे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता ३ रेल्‍वे गाड्यांमध्‍ये झालेली टक्‍कर याला अपघात म्‍हणणे, हे चुकीचे आहे.

रेल्‍वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्‍णव म्‍हणाले, ‘‘या भयंकर घटनेमागील मूळ कारण सापडले आहे. मला अधिक सविस्‍तर काही सांगायचे नाही. या घटनेचा अहवाल बाहेर येऊ द्या. मी आता एवढेच सांगू इच्‍छितो की, मूळ कारण आणि त्‍यासाठी उत्तरदायी ठरलेले लोक ओळखले गेले आहेत. ‘इलेक्‍ट्रानिक पॉईंट’ यंत्रणेवर आधारित ‘इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ यंत्रणेमध्‍ये काही तरी बिघाड झाला आहे.’’ रेल्‍वेचे ‘सिग्‍नल’ आणि ‘इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ यांसाठी हे महत्त्वाचे उपकरण आहे. मंत्र्यांच्‍या विधानावरून लक्षात येते की, रेल्‍वे कर्मचार्‍यांनी झालेल्‍या चुकीची संमती दिल्‍याचे लक्षात येते. अशा वातावरणामध्‍ये जिहादी किंवा माओवादी घातपात करण्‍याची शक्‍यता आहे.

जिहाद हा अखिल भारतीय स्‍तरावर असल्‍याने रेल्‍वेवरील आक्रमणांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेगाड्यांवरील आक्रमणे बहुधा जिहाद्यांना अपेक्षित संदेश देण्‍यात अल्‍प पडली असावीत. त्‍यामुळे अधिक प्रमाणात लोकहानी करणारे लक्ष्य शोधण्‍यात आले आणि कोरोमंडल एक्‍सप्रेस ही त्‍यांचे लक्ष्य ठरली.

लेखक : कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, माजी लष्‍करी गुप्‍तचर अधिकारी (६.६.२०२३)

(साभार : ‘इंडियन डिफेन्‍स रिव्‍ह्यू’चे संकेतस्‍थळ)