रशियाने मित्रराष्ट्र बेलारूसमध्ये पोचवली परमाणु शस्त्रास्त्रे ! – बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष
हिरोशिमा आणि नागासाकी यांवर फेकलेल्या बाँब आक्रमणांपेक्षा तीन पटींनी विनाशकारी !
मिन्स्क (बेलारूस) – रशियाने परमाणु शस्त्रास्त्रे बेलारूसमध्ये पोचवली आहेत. ही माहिती बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंको यांनी स्वत: रशियाच्या एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत दिली. त्यांनी सांगितले की, आम्हाला रशियाकडून क्षेपणास्त्रे आणि बाँब मिळाले आहेत. हे बाँब वर्ष १९४५ च्या जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी यांवर फेकलेल्या बाँबपेक्षा तीन पटींनी अधिक विनाशकारी आहेत.
Belarus starts taking delivery of Russian nuclear weapons https://t.co/eCgSPZ0oQC pic.twitter.com/I4Cb4PEAnT
— Reuters World (@ReutersWorld) June 14, 2023
लुकाशेंको पुढे म्हणाले की, पश्चिमी देश वर्ष २०२० पासून आम्हाला अनेक तुकड्यांमध्ये तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आम्ही रशियाच्या परमाणू शस्त्रास्त्रांना सीमेवर तैनात करणार आहोत. आवश्यकता पडल्यास आम्ही या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यासाठी मागे-पुढेही पहाणार नाही. यासाठी मला केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना संपर्क करावा लागेल.