‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ नावाने ओळखली जाणार !
नवी देहली – केंद्रशासनाने देहलीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’चे नाव पालटून आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असे ठेवले आहे. माजी पंतप्रधान नेहरू यांचा या ठिकाणी १६ वर्षे निवास होते. त्यांच्या निधनानंतर येथे संग्रहालय करण्यात आले होते. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ‘पंतप्रधान संग्रहालया’चे उद्घाटन केले होते. नेहरूंपासून मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी या संग्रहालयात माहिती, कागदपत्रे आणि छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत.
The #Nehru Memorial Museum and Library Society housed in Teen Murti Bhavan premises have been renamed as Prime Ministers’ Museum and Library Society, prompting sharp reactions from the #Congress.https://t.co/ewbTZR74cC
— The Hindu (@the_hindu) June 16, 2023