(म्हणे) ‘श्रीरामचरितमानस’ हे मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते !’ – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव
बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव यांचा ‘शोध’ !
पाटलीपुत्र (बिहार) – श्रीराममंदिराची लोक चर्चा करत आहेत. ‘श्रीरामचरितमानस’ जेव्हा लिहिण्यात आले होते, तेव्हा ते एका मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते. तुम्ही इतिहास डोकावून पाहू शकता. त्या वेळी तुमचे हिंदुत्व संकटात नव्हते का ? मोगलांच्या काळात हिंदू संकटात नव्हते का ?, असे विधान बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव यांनी केले. या विधानानंतर वाद होऊ लागल्याने सरकारमधील जनता दल (संयुक्त) या सहकारी पक्षाने ‘या विधानाशी आपला काही संबंध नाही’, असे म्हटले आहे. भाजपने यादव यांच्यावर टीका केली आहे.
‘रामचरितमानस मस्जिद में बैठकर लिखा गया था’: RJD विधायक
राजद विधायक रीतलाल यादव ने मानस ग्रंथ पर विवादित बयान दिया है और कहा है कि रामचरितमानस मस्जिद में बैठकर लिखा गया था, तब तो हिंदुत्व खतरे में नहीं था? यादव यहीं नहीं रुके, और आगे कहा कि अगर इतना ही हिंदुत्व का सहभागी बनना है… pic.twitter.com/0G7kVYAJ5K
— Bihar Tak (@BiharTakChannel) June 16, 2023
संपादकीय भूमिकायादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे ! |