कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत शिक्षिकेने लावली अजान !
मुंबई – कांदिवली येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात माहिती मिळताच शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुन्हा अशा प्रकारे ध्वनीक्षेपकावर अजान लावण्यात येऊ नये, अशा स्वरूपाचे पत्र शिवसेनेकडून शाळेला देण्यात आल्याचे समजते. ‘‘शाळेत जाणीवपूर्वक अजान लावण्यात आली. शिक्षिका मुसलमान असल्याने तिचे नाव पुढे आणण्यात आले नाही’’, असा आरोप शिवसेना आणि पालक यांनी केला आहे.
Mumbai News : कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने वाद; पालक संतप्त, शिवसेनेची तक्रार, शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त https://t.co/5QFEatgQq9#Kandivali #School #Azan
— ABP माझा (@abpmajhatv) June 16, 2023
शिवसेनेने अजान लावण्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर शाळेतील संबंधित शिक्षिकेला निलंबित केल्याचे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे. तसेच याविषयी स्पष्टीकरण देतांना शाळेने म्हटले, ‘‘विद्यार्थ्यांना सर्व धर्मांच्या प्रार्थना समजण्यासाठी आम्ही सर्व धर्मांच्या प्रार्थना लावतो. आज अजान लावण्यात आली.’’ (शाळेत हिंदु विद्यार्थी बहुसंख्येने असतांना अन्य धर्मांच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजण्याची आवश्यकता काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकाशालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता शिकवण्यावरून शिक्षणाचे भगवेकरण झाल्याचा कंठशोष करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? कि अजान ऐकणे हे धर्मनिरपेक्षतेचे द्योतक आहे, असे त्यांना म्हणायचे आहे ? |