कुकी ख्रिस्त्यांनी मणीपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांचे घर पेटवले !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये हिंदु मैतेई समाजावर होणारे आक्रमण अद्याप चालू असून १५ जूनच्या रात्री कुकी ख्रिस्त्यांच्या जमावाने केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर आक्रमण करून आग लावली. या घटनेच्या वेळी सिंह केरळ येथे होते. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत.
या घटनेविषयी केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले की, जे घडले ते पाहून पुष्कळ वाईट वाटले. मला सांगण्यात आले की, रात्री १० च्या सुमारास ५० हून अधिक आक्रमणकर्त्यांनी माझ्या घरावर आक्रमण केले. पहिल्या मजल्यावर आग लागली. वाहनेही जाळली. त्या वेळी घरी कुणीच नव्हते हे बरे झाले. ‘डोळ्याच्या बदल्यात डोळे’ असे केल्याने संपूर्ण जग आंधळे होईल. जे लोक या हिंसाचारात गुंतले आहेत ते देशाची मोठी हानी करत आहेत.
मणिपुर में उपद्रवियों ने केंद्रीय मंत्री के घर में देर रात लगाई आग: विदेश राज्यमंत्री बोले- प्रदेश में कानून-व्यवस्था ठीक नहीं, 100+ लोगों की हो चुकी मौत#Manipur #RajkumarRanjanSinghhttps://t.co/euNkE10SIi
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 16, 2023
म्यानमारमधून ३०० सशस्त्र आतंकवादी मणीपूरमध्ये घुसले
म्यानमारमधून ३०० सशस्त्र आतंकवादी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात घुसल्याचे सांगितले जात आहे. तोरबुंगच्या जंगलात तळ बनवल्यानंतर आतंकवाद्यांचा हा गट चुराचंदपूरच्या दिशेने जात आहे. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणा ड्रोनचा वापर करत आहेत.
संपादकीय भूमिकागेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो ! |