गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले !
जामनगर (गुजरात) – बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनच्या रात्री गुजरातच्या जखाऊ किनारपट्टीवर धडकल्यामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जण घायाळ झाले. त्याव्यतिरिक्त प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
चक्रवात बिपरजॉय गुजरात में तबाही मचाने के बाद अब शांत हो गया है और राजस्थान की तरफ बढ़ रहा है. बिपरजॉय सबसे लंबे समय तक अरब सागर में रहने वाला तूफान बन गया है- #Biparjoy #CycolneBiparjoy #BiparjoyUpdate #Gujarat https://t.co/eiJifTamwi
— ABP News (@ABPNews) June 16, 2023
या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकले असून त्याचा वेग मंदावला आहे.