राष्‍ट्रीय हिंदु अधिवेशनाच्‍या वेळी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सेवेसाठी आल्‍यावर नागपूर येथील सौ. पुष्‍पा बारई (वय ५७ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती !

‘वर्ष २०२२ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रीय हिंदु अधिवेशनाच्‍या वेळी मी सेवेसाठी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गेले होते. त्‍या वेळी मला पुढील सूत्रे लक्षात आली.

पू. (कु.) रेखा काणकोणकर

१. साधकांना सेवा देतांना वय आणि क्षमता पाहून देणे

आश्रमातील उत्तरदायी साधक सेवेसाठी आलेल्‍या साधकांना कोणतीही सेवा देतांना त्‍यांची क्षमता आणि त्‍यांचे वय पाहूनच सेवा देत होते.

२. स्‍वयंपाकघरातील साधक सेवा करतांना काही चूक झाली, तर अगदी प्रेमाने आणि शांतपणे त्‍याची जाणीव करून देत होते.

३. अफाट कार्यक्षमता असलेल्‍या पू. रेखाताई

सौ. पुष्‍पा बारई

पू. रेखाताई (सनातनच्‍या ६० व्‍या समष्‍टी संत पू. रेखा काणकोणकर, वय ४५ वर्षे) सेवेनिमित्त आमचा पूर्ण आढावा घेऊन रात्री उशिरापर्यंत कार्यरत रहायच्‍या आणि सकाळी पुन्‍हा आमच्‍या आधी स्‍वयंपाकघरात आलेल्‍या असायच्‍या. हे सर्व पाहून मन कृतज्ञतेने भरून यायचे.

४. अनुभूती

अ. मी घरी नागपूरला असतांना मला तळपायाची आग होणे, थकवा येणे, वाताचा त्रास होणे इत्‍यादी अनेक त्रास व्‍हायचे; परंतु आश्रमामध्‍ये सेवेसाठी आल्‍यावर माझे सर्व त्रास दूर झाले.

आ. माझी झोप न्‍यून होत होती, तसेच मी दिवसभर सेवा करत होते; परंतु मला हलकेपणा जाणवून उत्‍साह वाटत होता. पूर्ण १ मास मी दुपारची विश्रांती न घेता त्‍या वेळेत नामजप करत होते.

कृपाळू आणि दयाळू गुरुमाऊली, म्‍हणजेच परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याच कृपेमुळे या वैकुंठरूपी आश्रमात मला सेवेला येण्‍याची संधी मिळाली. यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. पुष्‍पा बारई, नागपूर, (८.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक