नागपूरमधील मेयो रुग्णालयात महिला आधुनिक वैद्याच्या वेशात फिरणार्या धर्मांधाला अटक !
नागपूर – येथील मेयो रुग्णालयामध्ये महिला आधुनिक वैद्याच्या वेशात बुरखा घालून फिरणार्या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून तो रुग्णालयात अधूनमधून महिलेच्या वेशात फिरत होता. आधुनिक वैद्यांचा अॅप्रन घालून फिरत असल्यामुळे त्याच्यावर फारसा संशय येत नसल्याने त्याचा लाभ घेत होता. महिला सुरक्षा रक्षकाच्या ही गोष्ट लक्षात आली. पोलिसांना बोलावल्यावर त्यांना त्याने आधुनिक वैद्य असल्याचे सांगितले. ओळखपत्र मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस चौकीत नेऊन बुरखा काढला असता ती महिला नसून पुरुष असल्याचे लक्षात आले. शेख याच्या जवळून ३ चोरीचे भ्रमणभाष हस्तगत करण्यात आले.
- अल्पसंख्यांकांमध्ये गुन्हेगार बहुसंख्य !
- ३ भ्रमणभाष संच जप्त !
संपादकीय भूमिका :रुग्णालयात असणारा धर्मांधांचा संशयास्पद वावर रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो ! |