करमाळा (बीड) येथे मुकादमाने डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका !
बीड – येथील एका मुकादमाने ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याच्या कारणावरून बीड जिल्ह्यातील कामगारांची ३ मुले आणि ३ मुली यांना कुंभेज येथे डांबून ठेवले. पोलिसांच्या साहाय्याने या मुलांची सुटका करण्यात आली. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतरही ऊसतोड मुकादमाने कामगारांकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगून मुलांकडून आणखी ३ मास काम करून घेतले. ‘पैसे द्या, नाहीतर मुले ठेवा’ अशी धमकीही त्याने दिली होती.