सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे पूजन !
रामनाथी (गोवा), १५ जून (वार्ता.) – एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पार्श्वभूमीवर सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात १४ जून २०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ध्वजारोहण केले. या विधीचे पौरोहित्य सनातनचे पुरोहित सर्वश्री अमर जोशी आणि सिद्धेश करंदीकर यांनी केले. या वेळी सद़्गुरु, संत आणि साधक उपस्थित होते. या प्रसंगी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी श्रीमन्नारायणाच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली.
सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ‘या ध्वजावर एका बाजूला प्रभु श्रीरामाचे चित्र, तर दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामरूपातील चित्र घ्यावे’, अशी आज्ञा केली होती. त्यानुसार हा कापडी ध्वज बनवून १४ मे २०२१ (अक्षय्य तृतीया) या दिवशी त्याची स्थापना करण्यात आली होती.
उपस्थित संत
सद़्गुरु स्वाती खाडये, सद़्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) सुनीता खेमका, पू. (सौ.) संगीता जाधव, पू. अशोक पात्रीकर, पू. रमानंद गौडा, सद़्गुरु नंदकुमार जाधव, पू. प्रदीपकुमार खेमका, सद़्गुरु सत्यवान कदम, सद़्गुरु नीलेश सिंगबाळ, सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
क्षणचित्रे
१. पूजन चालू असतांना उन्हाच्या झळा न्यून होऊन वातावरण आल्हाददायक झाले होते.
२. पूजन झाल्यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला. या वेळी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी वरुणदेवतेने आशीर्वाद दिला’, असे उपस्थितांना वाटले.