‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !
रामनाथी (फोंडा), १५ जून (वार्ता.) – येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे या पवित्र परशुरामभूमीत आगमन झाले असून १६ जून या दिवशी या महोत्सवाला उत्साहात प्रारंभ होत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत हिंदुत्वनिष्ठ हे अधिवेशनाच्या व्यासपिठावरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांची प्रभावी बाजू मांडून त्या दृष्टीने पुढील मार्गक्रमणाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
Less than 24 hours away!#Vaishvik_HinduRashtra_Mahotsav
⛳ To mobilise & unite diverse Hindu & patriotic organisations
⛳ To initiate socio-political programs to safeguard Hindus throughout the world
⛳ To ignite spark of Hindu Rashtra in the hearts of peopleCommences 16… pic.twitter.com/MrYzoQWXxm
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 15, 2023
भारतातील २८ राज्यांतील, तसेच विविध ९ देशांतील १ सहस्र ६०० हिंदुत्वनिष्ठांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. वैशिष्ट्य म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी या महोत्सवात सहभागी होणार्या हिंदुत्वनिष्ठांची संख्या अडीच पटींनी वाढली आहे. विविध प्रांतांमधील, विविध भाषिक, तसेच अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजक, पत्रकार, अभियंता आदी विविध क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनात सहभागी होत आहेत.
हिंदुत्वनिष्ठांच्या स्वागतासाठी श्री रामनाथ देवस्थानच्या प्रवेशद्वारावर भव्य कमान उभारण्यात आली आहे. अधिवेशनाची सर्व सिद्धता पूर्ण झाली असून सर्व हिंदुत्वनिष्ठांना अधिवेशनाची उत्सुकता लागली आहे. प्रत्यक्ष सहभागासह देशविदेशातील हिंदुत्वनिष्ठांना हे अधिवेशन ऑनलाईनही पहाता येणार आहे.