मनोज दाणीलिखित ‘अज्ञात पानिपत’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला !
पुणे, १५ जून (वार्ता.) – भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या वतीने ‘अज्ञात पानिपत’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मनोज दाणीलिखित आणि मर्वेन टेक्नॉलॉजीज् प्रकाशित या ग्रंथाचे प्रकाशन शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे, ज्येष्ठ विचारवंत आणि माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, तसेच पुस्तकाचे लेखक मनोज दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांनी या वेळी त्यांचे गुरु प्रा. आणि इतिहाससंशोधक ग.ह. खरे यांच्याविषयी आठवणी सांगितल्या.
‘अज्ञात पानिपत’ पुस्तकाचे लेखक मनोज दाणी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘या पुस्तकाचे लेखन करतांना पुष्कळ अनुभव आले. यासाठी कोणती साधने वापरावी त्याचा अभ्यास करता आला. या पुस्तकात लिहिलेल्या घटनांचे पुरावे गोळा करतांना केवळ मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन त्यातील संदर्भ घेण्यात आला आहे. पुस्तकात पानाचे एका बाजूला फारसी भाषेतील लिखाण आणि दुसर्या बाजूला मराठी अनुवाद दिला आहे.’’
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘‘पूर्वी इतिहास संशोधन करतांना ते एकट्याने करावे लागत असे; पण आता संघटितपणाने प्रयत्न करून इतिहास संशोधन केले जात आहे. सध्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. याला इतिहासप्रेमींनी विरोध करायला हवा. पानिपत हा मराठी माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे. ‘अटक’ येथे मिळालेला विजय हा एक दैदीप्यमान कालखंड असून कुठेही याचा सण म्हणून साजरा होत नाही; उलट याची कुचेष्टा केली जाते. इतिहासाच्या विडंबनावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.’’
‘अज्ञात पानिपत’मध्ये काय वाचाल ?
|