डेहराडूनमध्ये १७ वर्षांच्या हिंदु मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला
उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चा आणखी एक बळी !
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तरकाशीपासून अनेक भागात हिंदु समाज लव्ह जिहादच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला असतांनाही हे सर्व घडत आहे. आता राजधानी डेहराडूनमध्ये एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृत मुलगी शादाब नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती. तिच्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले की, शादाबने त्यांनाही त्याच्या जाळ्यात अडकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी शादाबवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
‘I am leaving your life, both of you be happy’: Minor Hindu girl commits suicide in Dehradun after writing a message with blood on wall, one Shadab accused of love jihadhttps://t.co/Rpf1gEsfHu
— OpIndia.com (@OpIndia_com) June 15, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शादाब मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. शादाबने मुलीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला असावा. मुलीने नकार दिल्याने तिची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला, असे एका वृत्तात म्हटले आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे; मात्र संपूर्ण अन्वेषणानंतर सत्य समोर येईल, असे त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदु मुलींना धर्मशिक्षण दिले, तरच असले प्रकार थांबतील, हे निश्चित ! |