पत्नीच्या नावे घर खरेदी करणे हा बेनामी व्यवहार नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय
कोलकाता (बंगाल) – पत्नीच्या नावावर घर घेण्यासाठी पतीने पैसे दिले असल्याचे जरी सिद्ध झाले, तरी हे सिद्ध होणे आवश्यक आहे की, नवर्याने हा व्यवहार पूर्णपणे स्वत:ला लाभ व्हावा आणि एकट्यालाच त्याचा लाभ मिळावा यासाठी केला आहे. यामुळे भारतीय समाजामध्ये जर एखाद्या पतीने पत्नीच्या नावावर घर घेण्यासाठी मोठी रक्कम दिली असली, तरी त्याला ‘बेनामी व्यवहार’ म्हणता येणार नाही.
लेन-देन केवल बेनामी नहीं है क्योंकि पति ने पत्नी के नाम पर संपत्ति खरीदने के लिए पैसे दिए थे: कलकत्ता उच्च न्यायालय https://t.co/8bk5jRDPJk
— बार & बेंच – Hindi Bar & Bench (@Hbarandbench) June 15, 2023
अशा व्यवहारात पैशांचा स्रोत हा महत्त्वाचा ठरतो; मात्र तो निर्णायक ठरत नाही, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी म्हटले.