संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत प्राणार्पण करणार्‍यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी स्मृती भिंत बांधण्यात येणार !

संयुक्त राष्ट्रांकडून भारताचा प्रस्ताव मान्य

न्यूयॉर्क  (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र महासभेने भारताने मांडलेला प्रस्ताव मान्य केला आहे. या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये एक स्मृती भिंत (मेमोरियल वॉल) बांधण्यात येणार आहे. यात संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये प्राण अर्पण केलेल्यांची नावे लिहून त्यांना श्रद्धांजली वहाण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी १४ जून या दिवशी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला १९० देशांना मान्यता दिली. पुढील ३ वर्षांत ही भिंत बांधण्यात येणार आहे.