रशियाकडून पाकला मिळणार्या तेलावर भारतात होते शुद्धीकरण प्रक्रिया !
रशियाने पाकच्या समोर ठेवली होती अट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – रशियाकडून पाकिस्तानला कच्च्या तेलाचा पुरवठा चालू झाला आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रशियासमवेत १ लाख टन तेल खरेदीचा करार केला असून त्यातील ४५ सहस्र टन तेल मिळाले आहे, अशी माहिती दिली आहे; मात्र या तेलावर शुद्धीकरण प्रक्रिया संपूर्णपणे भारतात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या देशांच्या नागरिकांसमोर उघड केलेली नाही, हे विशेष.
हमारी नकल करने निकला था शाहबाज, रूस तेल के जरिए भारत समेत ये 3 देश पाकिस्तान से बना रहे पैसा#Pakistan #Russiaoil #Indiahttps://t.co/ucAISq3Afy
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) June 15, 2023
१. रशियासमवेत तेलाविषयी करार करतांना पाकला मिळणार्या तेलावर भारतात शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येईल आणि त्याचे पैसे चिनी चलन ‘युआन’मध्ये पाकला द्यावे लागतील, या अटींवर रशियाकडून पाकला २० टक्के अल्प किमतीत कच्चे तेल देण्यात येत आहे. या अटी पाकने मान्य केल्या आहेत. रशियाकडून येणारे तेल गुजरातच्या वाडीनगर शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून संयुक्त अरब अमिरात येथे पाठवण्यात आले आणि तेथून ते पाकिस्तानला पोचले. रशियाची काही सरकारी आस्थापने संयुक्त अरब अमिरातमध्ये काम करतात. अशाच एका आस्थापनाने गुजरातमधून अमिरात येथे तेल आणून तेथून ते कराची येथे नेले.
३. पाकला रशियाने २० टक्के सवलतीत तेल दिले असले, तरी शुद्धीकरण आणि वाहतूक यांचा खर्च पाहिला, तर पाकला विशेष लाभ होतांना दिसत नाही. पाकला सौदी अरेबियाकडून ज्या किमतीत तेल मिळते, त्याच किमतीत रशियाकडून तेल मिळते, असेच यातून लक्षात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाकने रशियाकडून करण्यात येणार्या तेल खरेदीवर पुनर्विचार करत ते बंद केले, तर आश्चर्य वाटू नये, असेही म्हटले जात आहे.