राज ठाकरे यांना वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून अनोखी भेट !
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना १४ जून या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याने चक्क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्याचे चित्र आणि त्यावर फुली मारलेला केक भेट दिला. राज ठाकरे यांनी यापूर्वी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्यावरून आवाज उठवला होता. यंदा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवशी पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका, असे आवाहन केले होते.