ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील सौ. वैदेही पेठकर यांना ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’च्या कालावधीत आलेल्या अनुभूती
१. अधिवेशनाच्या वेळी सभागृहात देवतांच्या नावाचा जयघोष केल्यावर आलेल्या अनुभूती
अ. ‘जून २०२२ मध्ये ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी सभागृहात उपस्थित संत देवतांचा जयघोष करत होते आणि हिंदु राष्ट्राविषयीच्या उद़्घोषणा देत होते. त्या वेळी ‘संपूर्ण भारतात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले.
आ. मला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला मिळाले.
इ. माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला.
२. अधिवेशनाच्या वेळी ग्वाल्हेरमधील पत्रकारांचा भरभरून प्रतिसाद मिळणे आणि तो केवळ चैतन्याच्या स्तरावर मिळत असल्याचे जाणवून भावजागृती होणे
ग्वाल्हेरमध्ये मागील ५ – ६ वर्षांमध्ये आमचा एकदाही स्थानिक पत्रकारांशी संपर्क होऊ शकला नव्हता; परंतु या अधिवेशनाच्या वेळी अगदी सहजतेने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. दूरचित्रवाहिन्यांनी या अधिवेशनाचे वृत्तही दाखवले आणि ‘यापुढेही आम्ही तुम्हाला साहाय्य करू’, असे मला सांगितले. त्यांचे बोलणे ऐकूनच माझी भावजागृती होत होती. ‘केवळ चैतन्याच्या स्तरावर हा प्रतिसाद मिळत आहे’, हे मी अनुभवले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे : १७.६.२०२२ या दिवशी रात्री मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एका साधकाशी बोलत होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्याकडून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे मला दिसत होते.
३ आ. मला त्यांचा चेहरा हुबेहूब परात्पर गुरुदेवांसारखाच दिसत होता.
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भावजागृतीचा प्रयोग करून घेत असतांना आलेल्या अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भावजागृतीचा प्रयोग घेत असतांना हळूहळू वातावरणात पालट होऊ लागला.
२. मला तीव्रतेने दैवी सुगंध आला.
३. मला संपूर्ण वातावरणात दैवी कण दिसत होते. असे दैवी कण मला पहिल्यांदाच दिसलेे. ते पाहून माझे मन पुष्कळ शांत झाले आणि माझ्या अंतरातील कृतज्ञताभाव जागृत झाला.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेल्या अनुभूती
अ. ध्वनीचित्र-चकती पहातांना मला वाटत होते, ‘जणूकाही आमच्या हृदयमंदिरात तिन्ही मोक्षगुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) रूपात साक्षात् ईश्वराचेच आगमन होत आहे.’
आ. संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरत असल्याचे मला जाणवले.
इ. ‘आम्ही एका वेगळ्याच लोकात आहोत आणि माझे अस्तित्वच शिल्लक नाही’, असे मला जाणवत होते.
ई. माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.
‘अशा सर्व सुंदर आणि अविस्मरणीय अनुभूती मला दिल्या’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वैदेही पेठकर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश. (२१.६.२०२२)
|