‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मार्गदर्शन करतांना गुरुदेवांची जाणवलेली महानता !
१. ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या समारोपाच्या सत्राच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मार्गदर्शन करतांना त्या साधनेविषयी सांगत होत्या. तेव्हा मला व्यासपिठावर त्यांच्याविना कुणीच दिसत नव्हते.
२. माझ्याकडून अनेक प्रार्थना होत होत्या. मी आतापर्यंत गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) महत्त्व जाणण्यात सातत्य न ठेवल्याने केवढ्या मोठ्या चैतन्याला मुकलो, ते मला दिसत होते.
३. मी केवळ गुरुदेवांचे स्थुलातील रूप पहात होतो, आठवत होतो; मात्र त्यांनी त्रिभुवनात केलेले कार्य मी कधीच लक्षात घेतले नाही. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्याविषयी सांगत होत्या. तेव्हा प्रत्यक्षात वाल्मीकि ऋषि रामायण सांगतांना ‘प्रभु श्रीरामचंद्राचे भावपूर्ण वर्णन करत आहेत’, असे मला वाटत होते.
४. ‘गुरुदेवांचे कार्य किती अगाध आहे ! आणि हे जाणण्यास माझी बुद्धी किती थिटी पडली आहे’, याची मला जाणीव झाली. ‘आता गुरुदेवच माझ्या उद्धारासाठी माझ्यावरील आवरण नष्ट करून त्यांच्या खर्या रूपाची ओळख मला करून देत आहेत’, असे मला जाणवले.
‘विष्णुस्वरूप गुरुमाऊलीने माझी योग्यता नसतांना हा भावपूर्ण प्रसंग माझ्यासाठी घडवला, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. प्रसाद मानकर, परळ, मुंबई. (२४.६.२०२२)
|